नविन वर्षाच्या सुरुवातीला विविध प्रकारचे संकल्प मोठ्या उत्साहांत केले जातात. नविन डायरीचा शुभारंभ होतो. या संकल्पांमध्ये महत्त्वाचे असते ते बँकेशी संबंधित तारखांचा समावेश करणे. २०२१ च्या सुरुवातीला आपण महत्त्वाच्या काही तारखा विसरत तर नाही ना... याबद्दलची उजळणी करुया..
१. ३१ जानेवारी २०२१ ही ‘विवाद से विश्वास’ या योजनेसाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची शेवटची मुदत आहे. आयकरासंदर्भातील वाद मिटवण्याच्या उद्देशाने या योजनची घोषणा २०२० च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
२. आयकर कायद्याअंतर्गत 92E नुसार अहवाल सादर करणे अपेक्षित असणाऱ्या विशिष्ठ व्यक्तींसाठी आयकर विवरण पत्र भरण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२१ अशी आहे.
३. ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपला हयातीचा दाखला बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२१ अशी आहे. यापुर्वी ही मुदत ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत होती.
४. ऍडव्हांस टॅक्स भरण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२१ पर्यंत आहे.
१ एप्रिल २०२० पासून, लाभांश मिळकत स्वतंत्र प्राप्तकर्त्याच्या हाती करपात्र ठरली आहे. लाभांश उत्पन्न ही व्यक्तीच्या उत्पन्नास लागू असलेल्या आयकर स्लॅब दरावर करपात्र असते. वित्तीय वर्षात लाभांश उत्पन्न ५ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास टीडीएस लागू होईल.
५. पॅन कार्ड आधार क्रमांकाशी सलग्न करण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत आहे. ही मुदत यापुर्वी ३० जून २०२० पर्यंत होती. ती वाढवून ३१ मार्च २०२१ करण्यात आली आहे.