
भारताच्या फिनटेक यशोगाथेचा युपीआय हा निर्विवाद विजेता आहे. असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ चे उद्घाटन करताना काल बोलत होते.
यूपीआय आता ११ देशांमध्ये सुरू झाले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी एकेकाळी अकल्पनीय असलेली गोष्ट आता दैनंदिन वास्तव बनली आहे. भारताच्या प्रमुख डिजिटल पेमेंट प्रणालीच्या जागतिक विस्तारावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
भारताच्या फिनटेक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हा या यशोगाथेचा निर्विवाद विजेता आहे. हे इतके मोठे परिवर्तन आहे की जेंव्हा कधी फिनटेकवर चर्चा होईल, तेंव्हा ती युपीआय शिवाय अपूर्ण राहील. तांत्रिक सक्षमीकरण हा आपल्या विकासाचा पाया असल्याचे ते म्हणाले. युपीआयची आर्थिक समावेशनासाठीचे महत्त्वाचे साधन आहे असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. दिर्घकाळापासून दुर्लक्षित असलेल्या पारंपरिक बँकिंग मॉडेल्स क्षेत्रांमध्येदेखील युपीआयचा वापर यशस्वीरित्या पोहोचला आहे. केवळ ऑगस्ट महिन्यातच २४ अब्जाहून अधिक युपीआय व्यवहार झाले. ही बाब पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिली.
युपीआय ही केवळ एक तांत्रिक कहाणी नाही; ही एक सांस्कृतिक कहाणी आहे. असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय डिजिटल पेमेंटच्या पुढील धोरणात्मक टप्प्याची रूपरेषा मांडताना, मोदींनी भागीदार देशांच्या देशांतर्गत पेमेंट प्रणालींसोबत यूपीआयचे एकत्रीकरण करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला, जे सिंगापूरसोबत आधीच स्थापित झालेल्या अखंड सीमापार कनेक्टिव्हिटीच्या (seamless cross-border connectivity) धर्तीवर असेल. या भागात भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर राहतात किंवा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो, तिथे सर्व संबंधित घटकांनी आर्थिक नेटवर्क सक्रियपणे जोडावे, असे निर्देश त्यांनी दिले. परदेशस्थ भारतीयांसाठी असलेल्या आर्थिक फायद्यांवर जोर देत पंतप्रधान मोदींनी निदर्शनास आणले की, जगातील सर्वाधिक आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी व्यवहाराचा खर्च कमी करणे या सुविधेला प्राधान्य आहे. जागतिक स्तरावर डिजिटल पेमेंट प्रणालींचे एकत्रीकरण केल्यास परदेशातील भारतीयांना आपल्या देशात असलेल्या कुटुंबांना निधी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देता येईल.
UPI चा इतिहास (History)संकल्पना आणि विकास: २०१२ च्या सुमारास बँकर आणि तंत्रज्ञान तज्ञांनी एकत्र येऊन विना-वॉलेट डिजिटल पेमेंट प्रणालीवर चर्चा सुरू केली. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (NPCI) तत्कालीन प्रमुख ए. पी. होता यांनी या रचनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सुरवातीचा टप्पा: २०१६ मध्ये अवघ्या २१ बँकांसह सुरू झालेली ही प्रणाली सुरुवातीला संथ गतीने चालत होती. २०१६ मधील नोटाबंदीनंतर आणि त्यानंतर सरकारच्या 'भीम' (BHIM) ॲपच्या आगमनामुळे याला गती मिळाली.
फिनटेकचा प्रवेश आणि जागतिक भरारी: २०१८ मध्ये UPI 2.0 लाँच झाले, ज्यामध्ये ओव्हरड्राफ्ट खाती जोडणे, इनव्हॉईस पाहणे अशा अनेक सुविधा आल्या. PhonePe, Google Pay आणि Paytm यांसारख्या खाजगी ॲप्समुळे युपीआय भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.
सध्याची स्थिती: आज युपीआय जागतिक स्तरावर सर्वात मोठी रिअल-टाईम पेमेंट सिस्टीम बनली आहे. जगातील एकूण रिअल-टाईम डिजिटल व्यवहारांपैकी जवळपास ४९% व्यवहार एकट्या भारतात युपीआयद्वारे होतात.