Enter your Email Address to subscribe to our newsletters
Enter your Email Address to subscribe to our newsletters

सध्या चलनात असणाऱ्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करून त्याऐवजी ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे असंख्य पडसाद गेल्या दोन दिवसांपासून उमटत आहेत. अगदी whatsapp च्या विनोदांपासून ते अर्थतज्ज्ञांच्या लेखांपर्यंत, सगळीकडेच हा विषय सध्या एकदम 'top priority' वर आहे. सरकारच्या या निर्णयाचे परिणाम चांगले कि वाईट हे लक्षात यायला थोडा वेळ लागेल. पण कसेही असले तरी, हे परिणाम लक्षणीय असतील ह्यावर मात्र लगेच एकमत होताना सध्या दिसत आहे. ह्या लेखातून विशेषतः छोट्या आणि माध्यम व्यावसायिकांच्या संदर्भात, ह्या निर्णयाच्या नजीकच्या काळामध्ये होणाऱ्या काही परिणामाचा थोडक्यात आढावा घेतला आहे:
विमुद्रिकरण, GST, रोख व्यवहार कमी करणार
विमुद्रिकरण GST सोबत टॅक्सचे क्षेत्र वाढवणारेच असणार आहे. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, ज्या व्यवसायनिकांचा नफा हा सध्या विसंगत असलेल्या टॅक्सेस मुळे आहे, अश्या सर्वाना ह्या निर्णयाचा सगळ्यात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. अर्थातच, ५०० व २००० च्या नवीन नोटा चलनात आल्यानंतर देखील रोख व्यवहारांपेक्षा बँकेमार्फत होणाऱ्या व्यवहारांकडे कल वाढतच जाणार आहे आणि त्यामुळे आपल्या व्यवसायाची ह्या बदलला अनुरूप तयारी करून घेण्याची हि योग्य वेळ आहे.
डिसेंबर २०१६ मध्ये रीसीवेबल वाढण्याची शक्यता - तयारी आवश्यक
liquidity कमी झाल्यामुळे डिसेंबरच्या शेवटी सर्वच व्यवसायातील कॅश व्यवहारांवर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः, होलसेल ट्रेडिंग किंवा १५-३० दिवसांच्या क्रेडिट पेमेंट वरती चालणाऱ्या सर्व व्यवसायांना कॅश-liquidity कमी झाल्याची झळ पोहचू शकते. ग्राहकांकडून येणाऱ्या कॅशचा मंदावलेला वेग जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे. डिसेंबर-जानेवारी ह्या कालावधीत, विविध कारणांमुळे, सर्वच छोट्या व्यावसायिकांचा वाढीचा वेग थोडा शिथिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बँकामध्ये आलेला पैसे इतर वित्तीय पर्यायाना पूरक ठरणार
विमुद्रिकरणामुळे मोठ्या प्रमाणात बँकामध्ये पैसे जमा होऊन interest rate कमी होण्याची शक्यता असल्याचे या क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे. अर्थातच, सोने, जमीन अथवा स्थावर मालमत्ता ह्या पलीकडे जाऊन स्टॉक, म्युच्युअल फंड आणि असे इतरही वित्तीय पर्याय गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरतील. एकूणच, मार्च २०१७ पर्यंत रोख वापरण्यावर असलेली मर्यादा लक्षात घेऊन छोट्या/मध्यम व्यासायिकांना आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवून उत्तम परतावा मिळवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागू शकतील.