Enter your Email Address to subscribe to our newsletters
Enter your Email Address to subscribe to our newsletters
'टॅक्स' आणि व्यावसायिकांच्या कपाळावरच्या आठ्या यांचा तसा थेट आणि खूप जुना संबंध आहे. नवीन येणारी GST कर व्यवस्था ह्या आठ्या कमी करणार की वाढवणार? की व्यावसायिकांच्या कपाळावरच्या आठ्यांच्या ऐवजी ओठांवर स्मित आणणार... या विषय सध्या चर्चिला जातो आहे.
GST म्हणजे काय किंवा या नवीन कर पद्धतीचे वेगवेगळ्या व्यवसायांवर होणारे चांगले-वाईट परिणाम ह्या विषयी सर्व माध्यमामध्ये लिहून आलं आहे, येतही आहे. पण या लेखातून आपण विशेषतः छोट्या-मध्यम व्यावसायिकांवरती GST चे होणारे परिणाम हे पूरक असतील की, मारक असतील हे समजून घेणार आहोत.

GST - सुरुवातीला मारक ठरू शकतो
सध्या अस्तित्वात असलेले गुंतागुंतीची कर आकारणी, ह्या करांचे निर्माण होणारे थर आणि त्याच्यामुळे उत्पादक आणि उपभोक्त्याला द्याव्या लागणारी वाढीव किंमत हे संपुष्टात आणून एकच, देशांतर्गत करव्यवस्था निर्माण करणे हा GST चा मुख्य उद्देश आहे. अर्थातच, GST मुळे व्यावसायिक आणि उत्पादकांची करांच्या जाचक आणि गुंतागुंतीच्या जंजाळातून मुक्तता होईल अशी अपेक्षा आहे. पण कुठलाही बदल हा सोपा नसतोच. GST सारखा देशव्यापी आणि काही प्रमाणात क्रांतिकारी ठरलेल्या आर्थिक बदलाचा प्रवास सुद्धा काही व्यावसायिकांना त्रासदायक ठरू शकतो. कराच्या टक्केवारीमध्ये असलेले फरक हाच ज्यांच्या व्यवसायाच्या नफ्याचा मूलमंत्र आहे, अश्याना GST ची सगळ्यात मोठी झळ बसेल. विशेषतः वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या करांमधील फरकामुळे ज्या व्यवसायांना किमतीत फायदा मिळतो, अशांना GST मारक ठरू शकतो. मुख्यतः `ट्रेडिंग`, `असेम्ब्ली`, `डिस्ट्रिब्युशन` इत्यादी मध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना GST मुळे त्यांच्या ग्राहकांना आणि स्पर्धक व्यवसायांना होणारे फायदे-तोटे ह्याविषयी जागरूक राहाव लागेल.
बदलातून फायदा होण्यास वेळ लागेल
GST मुळे करांची रचना बदलेल व काही व्यवसायाच्या नफ्यांमध्ये अल्पकालीन घट होण्याची शक्यता आहे, तर काहींना ह्याचा फायदा होईल. नवीन करासंदर्भात आपण बरेचदा स्वतःच्या व्यवसायापुरता परिणामांचा विचार करतो. पण, GST च्या संदर्भात व्यवसायाला पूरक बनवून, जिंकण्यासाठी, तुमचे ग्राहक, स्पर्धक व्यावसायिक आणि विक्रेते ह्या सर्वावर नवीन करव्यवस्थेच्या होणाऱ्या परिणामांना समजून घेणे हे जास्त महत्त्वाचे राहील. १९९१ मध्ये भारतीय बाजारपेठ जागतिक उत्पादकांसाठी खुली करण्यात आली. तेव्हा देखील, सुरवातीच्या काळात, वेगवेगळ्या कारणांमुळे, छोट्या-माध्यम व्यावसायिक आणि उत्पादकांना ह्या नवीन व्यवस्थेची झळ लागलीच. पण कालांतराने व्यवसायामध्ये रचनात्मक बदल करून ह्याच नवीन व्यवस्थेमध्ये यशस्वीही होण्याचा मार्गही व्यवसायिकांनी शोधून काढला. GST चा बदलही छोट्या आणि माध्यम व्यवसायांसाठी सुरवातीला थोडसा त्रासदायक असला तरी भविष्यासाठी लाभदायकच ठरेल.